Newsprahar

फडणवीसांवर आरोप केल्यांनतर भाजप आमदाराचा जरांगेंना इशारा…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : मराठा आरक्षणाच्या  मागणीवरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे. आज उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक होत मनोज रंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप केले आणि त्यानंतर ते आंदोलनस्थळावरून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रसाद लाड म्हणाले, दहा टक्के आरक्षण मिळाल्यावर तुमचा खेळ संपला हे समजते. समाजाची फसवणूक करू नका. समाजाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. मनोज जरांगे यांनी सांगावे तो श्रीमंत कोण? त्यांनी नौटंकी थांबवावी, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. फडणवीसांचे नाव घेऊ नका असे सांगितले होते. यानंतरही फडणवीसांचे नाव घेण्यास कोण भाग पाडत आहे, हे सर्वांनी पाहिले आहे, असेही लाड म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापला असून मराठा आरक्षण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.