Newsprahar

पुण्याच्या वेशीवर दम मारो दम; हुक्का पार्लरचा उच्छाद; लोणी काळभोर पोलीसांचे दुर्लक्ष…

न्यूज प्रहार  ( पुणे ) – लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कवडी पाट टोलनाक्या जवळील जयश्री हॅाटेल मध्ये हुक्का पार्लर चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती “न्यूज प्रहार” हाती लागली या बाबत पोलीस काय कारवाई करणार?

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत व परिसरात सर्रासपणे अवैध हुक्का पार्लर चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी गावठी दारूसह अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.

अवैद्य गोवा ,गुटखा यांची सर्रासपणे पान टपऱ्यांमध्ये विक्री सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. लोणी काळभोर परिसरासह अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय चोरून सुरु आहेत. अनेक वॉईन शॉप बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने गांजा , हुक्का ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा हुक्का ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. कवडी पाट टोलनाक्या शेजारी रस्त्यांवरील जयश्री हॉटेलमध्ये हुक्का पार्लर व्यवसाय चालतो.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.तसेच या परिसरातील बऱ्याच हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय देखील चालवला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे परंतु पोलीसांचे अवैध धंद्यांना अभय आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीत वाढ…

वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्सास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.

मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करण्यासारखे प्रकार वाढीस लागले MIT कॅालेज रस्त्यावरच मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सशस्त्र टोळक्याने रात्री अपरात्री दहशत माजवण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. 

आयुक्त साहेबांच्या आदेशानंतर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर अटकाव आणण्यात आला आहे. नुकतीच अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाला त्याठिकाणी ड्राईव्ह घेण्यास सांगण्यात आलेले आहे. त्याचबरोबर, आणखी परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. असे आयुक्त साहेबांचे आदेश आसताना लोणी काळभोर पोलीसांचे नेमके चाललंय तरी काय ? असा प्रश्न नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया…

लोणी काळभोर परिसरामध्ये राजरोसपणे नशेची साधने सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई पूर्णपणे नशेच्या विळख्यात अडकली आहे.