पुण्यातील प्रसिद्ध गुटखा सप्लायर : कोथरूड परिसरात सुजित खिवंसरा, हडपसर मंदार ठोसर आणि मॉन्टी, कोंढवा येथे प्रकाश भाटी, आणि गुड्डू, गोकुळ नगर मयूर आगरवाल, हिंजवडी शाम जाट, महेंद्र राठोड, निगडी गजानन पवार, काळेवाडी दिनेश गांधी, चाकण ओमप्रकाश विष्णोई…
न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे शहरात वेळोवेळी ड्रग्सवर मोठी कारवाई झाली परंतु गुटखा बंदी असताना सुद्धा शहरात खुलेआम गुटखा विक्री केली जाते तरीदेखील पुणे पोलीस आयुक्त या गुटखा माफियांवर कारवाई करण्यास कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे हे इतर सर्व गोष्टींवर कारवाई करतात मग गांजा व गुटखा यांच्या नजरेतून सुटतोच कसा ?असा प्रश्न देखील नागरिक करत आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आल्यापासून अनेक अवैध धंद्यांवरती वचक बसला हॉटेल ठराविक काळात बंद होतात परंतु गोवा गुटखा , गांजा विक्रेते हे मोकाट सुटलेले दिसून येत आहेत. राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे.पुणे शहरात फक्त गुटख्याचीच नाही अनेक अंमली पदार्थांची विक्री होत आहे.मुंबईतून पुणे, बेंगळुरू तसेच इतर राज्यांत चालणारी अंमली पदार्थांची वाहतूक पुणे शहरातून होते.
याचा फायदा घेऊन या ड्रग्जमाफियांनी पुणे शहराला ‘ड्रग्ज हब’ बनविले आहे. वाघोली कोथरूड, सिंहगड कॅम्पस, कोरेगाव पार्क ,बाणेर ,बालेवाडी कॉलेज कॅम्पस आयटी पार्क परिसरात गुटखा, ब्राउन शुगर, गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये गुटखा आणि गांजाची विक्री होत आहे. शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे या विरोधात कारवाई केली जात असली, तरी ही कारवाई पुरेशी पडत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
प्रत्येक पानटपरीत गुटखा विक्री…
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात दहा हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्या आहेत. या टपऱ्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त टपऱ्यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे. अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
. गोवा गुटख्याचे डीलर वाघोली मधील चोरडिया पुण्यामधील अग्रवाल कोथरूड मधील खीवंसारा हे मोठे व्यापारी अनेक दुकानदार टपरीधारक यांना गुटखा पुरवण्याचे काम करतात यांच्यावर नाममात्र कारवाई होते असे नागरिकांचे म्हणणे आहे यांच्यावर ठोस कारवाई झाली तर शहरातील गुटखा मिळण्याचे प्रमाण कमी होईल.
शाळकरी मुलेही व्यसनाधीन…
गेल्या काही वर्षांत गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहे. त्यामुळे तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपऱ्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे.
सविस्तर आढावा पुढील बातमीत –