पुणे शहरातील पोलीस ठाण्याच्या वसुली वाल्यांची बदली झाली मात्र, पुणे पोलीस क्राईम ब्राँच मधील वसुली वाल्यांचं काय?
यांना नेमका कोणाचा आशिर्वाद…
News Prahar ( पुणे ) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना अवैध्य धद्यांचे हप्ते गोळा करण्याचे काम करण्याची सवय लागली होती म्हणून त्यांना पोलीस आयुक्तांनी एक प्रकारचे चांगले शिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र, उजळणीसाठी आलेले बहुतांश कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणारे ‘कलेक्टर’ असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या शिकवणी नंतर वरील कलेक्टर सुधारणार की पुन्हा कलेक्शनची कामे सुरू करणार? यावर पुणे शहरातील अवैध धंद्यांचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्यातील 44 कलेक्टरांवर कारवाईचा बडगा चालू केला परंतु पुणे पोलीस आयुक्तालयामधील वरिष्ठांच्या नावाखाली वसुली करणारे यांना मात्र सूट दिली आहे का? यांना यांचे वर्तन सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त सूट देत तर नाहीत ना ! अशी चर्चा दबक्या आवाजात पुण्यातील नागरीक करत आहे .
यामध्ये प्रामुख्याने आबा लोखंडे हे तर पुणे शहरातील गुटखा व्यापारी यांच्याकडून दर महिना हप्ता गोळा करत असल्याची माहिती मिळते. तसेच यांना पुणे शहरात गुटखा वसुलीचे किंग म्हणून ओळखले जाते. तसेच संजय भापकर, संपते ,अमोल सरतापे हे देखील पुणे पोलीस आयुक्तांच्या नजरचुकीने राहिले आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .हे सर्वजण वरिष्ठांची वसुली करतात असे सांगतात . यांचे वरिष्ठ त्यांना वसुली करण्याच्या सूचना देतात का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैद्य धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवले आहे. तर मग त्या वरिष्ठांच्या वसुलदारांवर पुण्याचे पोलीस आयुक्त एवढे मेहरबान का ? हेच नागरीकांना समजत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असताना देखील पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांना पाठबळ देऊन अवैध धंदे सुरु ठेवत होते. कलेक्शन थांबवून पुणे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या पोलीस उपआयुक्त,सहायक पोलीस आयुक्त कर्मचाऱ्यांचे हप्ते वसुल दारांचे काय ? असा प्रश्न पुण्यातील नागरीकांना पडला आहे .पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कोणती कारवाई करतील की ,या वसुलदारांना असेच मोकळे वसुली करण्यासाठी सुट देतील हे पहाणे पण एक प्रकारचे कोडेच आहे.