Newsprahar

पुणे विभागातील सेंट मेरी उपविभाग, रस्ता पेठ महावितरण विभागाला महाराष्ट्रातील पहिला हॅट्रिक आय एस ओ मानांकनाचा मान मिळाला…

न्यूज प्रहार (पुणे प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, 22/22/11 के. व्ही. रेस कोर्स उपकेंद्र, महावितरण सेंट मेरी उपविभाग , रास्ता पेठ विभाग या उपकेंद्रास आयएसओ मानांकन प्रशस्तीपत्रक विद्युत सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण प्रमाणपत्र व गुणवत्ता प्रमाणपत्र असे तीन आयएसओ मानांकन प्रशस्तीपत्रक विवरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून :

  1. मा. श्री.राजेंद्र पवार साहेब मुख्य अभियंता. 
  2. महावितरण पुणे परिमंडळ तसेच.
  3. श्री. अरविंद बुलबुले अधीक्षक अभियंता रा. पे. शहर मंडळ.
  4. श्री संजीव नेहते अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पुणे.
  5. श्री .भगवान थेटे कार्यकारी अभियंता (प्रशासन).
  6.  श्री .विजेंद्र मुळे कार्यकारी अभियंता (स्थापत्य).
  7. श्री .चंद्रकांत दिघे कार्यकारी अभियंता रास्ता पेठ विभाग.
  8. श्री. नंदकुमार देशमुख प्रधान परीक्षक आय एस ओ.

 तसेच या कार्यक्रमाचे आयोजक :

  1. श्री. राजेंद्र भुजबळ (अति. कार्यकारी अभियंता).
  2. श्री. निलेश रोहनकर(अति. कार्यकारी अभियंता).
  3. श्री स्वप्निल जाधव (सहाय्यक अभियंता).
  4. श्री. कुंडलिक काशीद (वरिष्ठ यंत्र संचालक).
  5. श्री. विठ्ठल भोसले (यंत्र संचालक).
  6. श्री. गोकुळ साळुंखे (उपकेंद्र सहाय्यक अभियंता).
  7. श्री. अनिरूद्ध थोरात (बाह्य स्त्रोत यंत्र संचालक).

व सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद महावितरण सेंट मेरी उपविभाग, रास्ता पेठ विभाग या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेंद्र भुजबळ सर यांनी याबाबत प्रशस्तीपत्रक वितरणा सोबतच या विभागात नव्याने सुरू केलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशन तसेच या विभागातील कर्मचारी वर्गाला थोडं तरी कामातून उसंत मिळावी म्हणून कर्मचारी वर्गाचा विचार करून या ठिकाणी बॅडमिंटन पीच तयार केले आहे.

याचे उद्घाटन सुद्धा प्रमुख पाहुण्यांनी केले तसेच सर्व अधिकारी वर्गासाठी व कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांचे रक्त तपासणी,डोळे तपासणी बीपी शुगर तपासणी तसेच लठ्ठपणावरती कसे नियंत्रण करता येईल त्यासाठी सुद्धा तपासणी केंद्र होते , त्यामुळे कर्मचाऱ्याला होणारा आजार हा लगेच समजेल व त्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील यासाठी भुजबळ सरांनी एक आगळावेगळा उपक्रम यानिमित्ताने आयोजित केला होता.

भुजबळ सरांनी खूप छान पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्वांनीच खूप मेहनत घेतली होती या विभागात भुजबळ सर आल्यापासून सहा ते सात महिन्यात तीन मानांकनाचे प्रशस्तीपत्र मिळाले त्यामुळे त्यांचे विशेष असे कौतुक माननीय प्रमुख पाहुण्यांनी केले. तसेच हे तीन प्रशस्तीपत्रक महावितरणासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत याची माहितीही यांनी या कार्यक्रमाच्या वेळी दिली तसेच प्रत्येक महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी सुरक्षा पाळावी यासाठी सूचनाही केल्या.

सेंट मेरी उपविभागाचे इतर विभागातील सर्वांनीच अनुकरण करावे असे देखील सरांनी यावेळी सांगितले . श्री. पवार सर देखील वेळोवेळी सर्व विभागात येऊन पाहणी करून वेळोवेळी सूचना करत असतात. यावेळी पटणी सर यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी शिबिर घेण्याचे व घेत असल्याचेही सांगितले .

प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे संरक्षण किंवा स्वतःची सुरक्षा कशी केली पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितले. यासोबतच श्री. देशमुख सर यांनी हे तीन प्रमाणपत्रे कशा पद्धतीने मिळाले हे यावेळी सांगितले की या लोकांनी घेतलेली सुरक्षिततेची काळजी आजूबाजूच्या पर्यावरणाला कुठेही धक्का न पोचता महावितरण कशा पद्धतीने काम करतो व सोबतच यांची काम करण्याची शंभर टक्के गुणवत्ता यामध्ये तपासली जाते व त्यानुसारच यांनाही प्रमाणपत्र दिले जातात, हे सुद्धा सरांनी यावेळी सांगितले.

देशमुख सर हे आय एस ओ चे प्रधान परीक्षक आहेत त्यांनीही यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे या विभागाला महाराष्ट्रातील पहिला हॅट्रिक सुरक्षा, गुणवत्ता व पर्यावरण असे मानाचे प्रमाणपत्र एका वेळेस मिळाले त्यामुळे सर्व कर्मचारी व अधिकारी आनंदी होते या कार्यक्रमाची सांगता महावितरणाची सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन झाली.