न्यूज प्रहार : ( पुणे प्रतिनिधी ): नवले पुलाजवळ विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
कात्रजकडून नवले पूलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलजळ हा अपघात घडला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. काही लोकांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.