संगमनेर : घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोटा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोटा गाव अकलापूर रोड मुन्ना शेख यांच्या जागेत निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये राजू लाबखेडे यांचा पत्त्याचा क्लब आहे तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट न्युज प्रहारच्या प्रतिनिधी शी संपर्क साधला आहे. अहमदनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी याकडे गांबिर्याने लक्ष घातले पाहीजेल.
या पोलिस स्टेशनच्या हद्दीत ऎकुण ४६ गावे तसेच वाड्या वस्त्यांचा मोठा परिसर आहे गेल्या काही वर्षापासून पठार भागात गुन्हेगारी बळावली आहे पठार भाग संवेदनशील बनत चालला असताना यात अनेकदा चोऱ्या दरोडे राजकीय गुन्हे अवैध व्यवसाय यामुळे हे पोलीस स्टेशन चर्चेत आले होते. पठार भागातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विद्युत पंपाच्या वाढणाऱ्या चोऱ्या यामुळे शेतकरी देखील हैरण झाले होते परंतु या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर यांनी सुरुवातीचे काही महिने अगदी धडकेबाज एन्ट्रीमारत कारवाईचा बडगा उचलला होता परंतु आता हा बडगा थंडावला आहे .
याचे कारण यांना मिळणारे मजबूत पॅकेज तर नाही ना असा प्रश्न सध्या नागरिक करत आहेत सुरुवातीला त्यांनी सराई दरोडेखोर चंदन तस्कर जेर बंद केल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत होते परंतु थोड्याच दिवसात या साहेबांनी रंग दाखवायला सुरुवात करत अवैद्य धंद्यावाल्यांना पाठीशी घालत आपले काम सोपे करून घेतले आहे.
या परिसरात दारू, मटका, जुगार असे आवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. दारू व जुगाराच्या व्यसनांमुळे येथील तरूण पिढी उद्धवस्त झाली आहे. शिकण्यासवरण्याच्या वयात तरूण मुले व्यसनाधीन होत आहेत. येथील अवैध धंद्यामध्ये महिलांचाही सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यासोबतच अवैध्य वेश्याव्यवसाय, पत्त्यांचे जुगार, गोवा गुटखा विक्री चक्री बिंगो याच सोबत गांजा विक्री सुद्धा या परिसरात जोरदारपणे सुरू आहे तरी देखील या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाताची घडी तोंडावर बोट अशा स्वरूपाचे काम करत आहेत.
संबंधित व्यक्ती लाखो रुपये कमवत असल्याचे आरोप गावातील नागरिकांनी केले आहेत जुगार व मटक्याच्या नादामुळे सर्वसामान्य मात्र कष्टाची कमाई घालवत आहेत येथील जुगार मठ काढण्यांवर पोलिसांची कारवाई होते परंतु कारवाईनंतर मागे लगेच धंदे पूर्ववत सुरू होतात यामुळे पोलीस फक्त कारवाईचा फार्स करीत आहे असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जो तक्रार करायला येतो त्याला या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणतात की तुम्ही माझ्याकडे या त्यांच्याकडे जाऊन करायचे काय असा प्रश्नही नागरिक करत आहेत यांच्याकडे गेले असता अवैध धंदे यांची माहिती घेतली जाते व तुला याचे करायचे काय? असा प्रश्न देखील याच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात हे जर असे चित्र असेल तर घारगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब कोणती कडक कारवाई करतील का? असा प्रश्न नगर मधील थानिक नागरीक उपस्थित करत आहेत .
महसूल मंत्री विखे पाटील यांनी यांच्या कामाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना खेडेकर यांना कायम करण्याची सूचना केली होती त्यानंतर त्यांना कायम केले गेले त्यामुळेच हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता स्वतःचे रंग दाखवत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी समस्त नागरिकांची मागणी आहे.