Newsprahar

गट तट सोडुन युवकांनी आप मध्ये प्रवेश करावा ,वीर पाटील…

प्रतिनिधी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालेल्या गटातटाच्या राजकारणाला अनुसरून आम आदमी पक्ष आप युवा आघाडी चे इंदापूर ता युवक अध्यक्ष मनोज वीरपाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपमध्ये सामील व्हा असे आवाहन केले आहे.

 एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही गट स्वार्थासाठी भाजपा सोबत गेले असुन सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता या पैकी कोणाचे या नेत्यांना देणे घेणे नाही राहिले त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता ने स्वतः चा वेळ वाया घालवु नये असे वीर पाटील म्हणाले आप हा तरूणांना संधी देणारा पक्ष आहे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य युवकांना सांभाळुन घेऊन संघटणा मोठी करु तालुक्यातील युवकांनी आप मध्ये एक जुटीने यावे .आसे वीर पाटील म्हणाले