न्यूज प्रहार या वृत्तपत्राने गुटखा माफी यांची पोलखोल करण्यास सुरुवात करताच पोलिसांना आली जाग…
न्यूज प्रहार ( खेड–शिवापूर ) : मागील एक आठवड्यापासून न्यूज प्रहार ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ग्रामीण प्रशासन खडबडून जागे झाले व खेड- शिवापूर ते सासवड रस्त्यावरील कासुर्डी खे.बा. घाटात राजगड पोलिसांनी मंगळवारी (ता. ५) सकाळी गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर कारवाई केली.
या वेळी बेकायदा गुटख्याची वाहतूक करणाऱ्या या वाहनातून सुमारे १६ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चेतन दत्तात्रेय खांडेकर (वय २०) आणि प्रवीण दत्तात्रेय खांडेकर (वय २३, दोघेही रा. कोथरूड, पुणे) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, खेड-शिवापूर ते सासवड रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी मंगळवारी सकाळी कासुर्डी घाटात सापळा लावला होता.
यावेळी घाटातून जाणारे एक संशयित पिकअप वाहन पोलिसांनी बाजूला घेतले. यावेळी त्या वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पिकअप वाहन आणि त्यातील सुमारे १६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.