Newsprahar

कोरेगाव पार्क मधील हॅशबॅक पब मध्ये अल्पवयीन मुलांचे दम मारो दम…

न्यूज प्रहार ( पुणे ) : विद्येच माहेरघर आसणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. तरूणाई मोठ्या प्रमाणावर दारू,हुक्का,गांज्या,चरस,ड्रक्स,बॅांग,व्हॅाईटनर,सिगारेट, गुटखा अश्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींनी रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात कोरेगाव पार्क येथील हॅशबॅक येथे पोलीसांना गुंगारा देत हा पब लेट नाईट पार्टी व हुक्या साठी सुरू आहे.

नियमबाह्य पद्धतीने अल्पवयीन मुलांना पार्टी मध्ये प्रवेश दिला जात आसल्याचा व्हिडीओ न्यूज प्रहारच्या हाती लागला आहे तरी रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड लावले जातात. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हॅशबॅक या नामांकित हॉटेल्सवर कारवाई कधी?पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॅशबॅक पब हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आसल्याचे चित्र सध्या आहे.

मुंबईत कमला मिल पबमधली आग हुक्यामुळेच लागली त्यामुळे महाराष्ट्रात हुक्काबंदी व तंबाखूजन्य पदार्थास विक्रीस कायमस्वरूपी बंदी महाराष्ट्र शासनाने आणली परंतु एवढे असूनही पुण्यामधील कोरेगाव पार्क या ठिकाणी अल्पवयीन मुलांना हॅशबॅक पब हुक्का पार्लरमध्ये परवानगी देण्यात येते, तसेच फक्त हुक्का पार्लर नव्हे तर पहाटे पाच ते सहा पर्यंत चोरट्या पद्धतीने पब चालवले जातात. कशी असतात हि हुक्का पार्लर? कोण तरुण-तरुणी जातात तिथं? का जातात? नेमकी ही हुक्कयाची नशा आहे काय? याचा हुक्का पार्लरमधूनच एक खास रिपोर्ट…

शाळकरी मुलांच्या गप्पांत आऊटिंगला जाण्याचा प्लॅन ठरला. मुलामुलांनीच बाहेर जायला घरच्यांचीही ना नव्हतीच. त्यांनीही परवानगी दिली. हॉटेलिंग, आऊटिंग या मुलांसाठी नवीन नव्हतंच. म्हणून मग एकजण म्हणाला काहीतरी खास, कुछ हट के करायचं. याच आयडियातून हुक्का प्यायचं ठरलं. अरे नको, काही झालं तर असं म्हण्याचा बाकीच्यांनी दटावलंच. अरे यार काही नाही होत, सेफ आहे, मजा येईल, ट्राय तर मार! मग सगळ्यांनीच ट्राय मारला. शाळकरी वयाची १३-१४ वर्षांची ही मुलं मग नियमित हुक्का पार्लर गाठू लागली. आणि सहज सांगूही लागली, ‘इट्स ओके, चील मार, ‘कशका सिर्फ धुवां तो है…’

पुण्यामधील कोरेगाव पार्कमध्ये गरीब व मिडल क्लास सोबतच अतीश्रीमंत जगातल्या तारुण्याला या हुक्कयाचं कमालीचं वेड लागलेलं दिसतं. ‘स्टेटस सिम्बल’ असल्यासारखं अनेकजण हुक्का पार्लरमध्ये जातात. उत्तररात्र उलटून गेली तरी ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणतात.हुक्का पिण्यात अनेकांना प्रतिष्ठा वाटते. आपलं व्यसनही सामान्यांच्या खिशाला परवडण्या पलिकडचं आणि प्रतिष्ठित आहे असा फीलही आहे. तोच ‘फील’ कायम ठेवत हुक्का पार्लर सजवले गेले. चकाचक हॉटेलच्या आड हे आलिशान हुक्का पार्लर राजरोस सुरु झाले.

फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील लहानमोठ्या शहरातल्या, हाती पैसा असणाऱ्या तरुणांना हुक्कापार्लंरचे दरवाजा हाका मारु लागले. या पार्लरची सजावट, अनोखी रंगसंगती आणि नवाबी बैठकीसारखी आसनव्यवस्था हे सारं कुणालाही मोहात पाडणारंच आहे. तरुण इथं येतात तशाच तरुणीही. मुलींचीही हजेरी वाढू लागल्यानं या हुक्का पार्लरची चलती वाढली. राज्यातील ४० टक्के मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती नशा मुक्ती मंडळाकडे उपलबध आहे.

कोरेगाव पार्क मधील हॅशबॅक पब चालकावरती मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवतो म्हणून हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. हा फरार आरोपी पोलिसांना का सापडत नाही, हा फरार आरोपी  रात्री त्याच्या पब मध्ये बिनधास्त पार्टी करत असतो. पोलिसांना हवा असणारा आरोपी फरार आहे,असे दाखवण्यात येते.मग हा रात्री इकडे तिकडे फिरतो तेव्हा पोलीस काय करतात ? हा प्रश्न ही स्थानिक नागरिक करत आहेत.याच्या पब मध्ये अल्पवयीन मुलांना परवानगी दिली जाते,अनेक लहान मुलांना या व्यसनाकडे वळवत असताना देखील पोलीस प्रशासन या फरार पब चालकाला का पाठीशी घालत आहे ? असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जर हुक्का पार्लरमध्ये लहान मुलांना नशा करणाऱ्या गोष्टी पुरवल्या जात असतील. त्यांना व्यसनाधीन बनविले जात असेल तर हे गंभीर आहे मग त्याच्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत? एकीकडे हुक्का म्हणजे काहीतरी ‘भारी’ असा समज दुसरीकडे आपण कुठल्या फ्लेवरचा हुक्का पितो याबाबतीतही तरुण मुलामुलींत स्पर्धा दिसते.

अ‍ॅपल, स्ट्रॉबेरी, मिंट, चॉकेलेट, फायर अ‍ॅण्ड आईस ब्रेन फ्रीजर, नाईट क्वीन यातला कुठला ‘कश’ अधिक चांगला यावरून तरुणांत चर्चा रंगते. उच्चभ्रू वर्गातले तरुण या स्पर्धेत आघाडीवर. पण सामान्य मध्यमवर्गीय तरुणांनाही उच्चभ्रू जगाचा मोह पडूच शकतो कारण अनेक हुक्का फ्लेवर पाचशे रुपयांपासून मिळतात. पाचशे रुपये ते २५ हजार रुपये या चढ्या दरात हुक्का पिणारे आहेत. तरुणांच्या जगात व्यसनांचं आकर्षण चटचट पसरतं, परस्परांना ट्राय करुन पाहण्याचे आग्रह तर होतातच. पण आता थेट ऑनलाईनही हुक्क्याची माहिती सहज मिळते.

आता हे इथपर्यंत ठीक होतं परंतु पाच वर्षे पुढील मुलांनाही हुक्का पार्लरमध्ये व पब मध्ये एंट्री दिली जाते व हॅशटॅग कर असं त्याला सांगण्यात येतं तसं पाहता कोरेगाव सारख्या उच्चभ्र लोकवस्ती असणारे ठिकाणी हे पब  व हुक्का पार्लर आज सीपी सरांची परवानगी नसतानाही चालू आहेत व हे एवढ्यावरच न थांबता मोठ्या आवाजात साऊंड लावणे रात्र रात्र हुक्का पार्लर व पब चालू ठेवणे तसेच अल्पवयीन मुलांना परवानगी देणे हे सर्व पुण्यासारख्या ठिकाणी सुरू आहे यावर कोणी पोलीस आयुक्त कोणती कारवाई करतील व स्थानिक पोलीस निरीक्षक यावर काय करतील ?  हा प्रश्न नागरिक विचारत आहेत वारंवार स्थानिक पोलीस स्टेशनला यांचे व्हिडिओ जातात कंट्रोलला कॉल जातात तरीही स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाई करण्यास जानून बुजून दुर्लक्ष करतात, असे अनेक प्रश्न नागरीक करत आहेत.