पुणे – कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. या बांधकामांना राजकीय नेत्यांचाही वरदहस्त असण्याची शक्यता आहे. अनाधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘न्युज प्रहार’ला माहिती सांगितली आहे.
पुणे शहराच्या जवळ कोंढव्यात अनेक भागांत ही बांधकामे सुरू आहेत. मात्र, ही बांधकामे थांबविण्यासाठी कुशल मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन प्रशासन डोळेझाक करीत आहे. पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा सर्व्हे प्रशासनाने कधीच केला नाही. विकासाचा डंका पिटणाऱ्या पुणे शहरांत गेल्या दहा वर्षांत झालेल्या बेकायदा बांधकामांचा प्रश्न मोठा आहे. बांधकाम व्यवसायिकांनी पालिकेतील मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील अभियंत्यांना हाताशी धरून कोंढवा खुर्द नवीन इमारतींना पार्किंग ठेवले नसल्याचे पाहावयास मिळते. आम्ही कारवाई करू, असे ढोबळमानाने उत्तर प्रशासनाकडून दिले जाते.
कोंढवा खुर्द सर्वे नंबर ४६ महापालिका हद्दीत सध्या उंच उंच बांधकामे सुरू आहेत. त्यापैकी बरीच बांधकामे अनधिकृत, तर पूर्वीची बांधकामे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने ‘न्युज प्रहार’ला सांगितले. मात्र, प्रत्यक्षात भरपुर प्रमाणात बांधकामे सुरू असून पूर्वीची विनापरवाना बांधकामे पूर्ण झाली असल्याचे पाहावयास मिळाले.
बांधकाम परवाना लवकर मिळत नाही, महानगर पालिकेत अधिकारी भेटत नसल्याने परवानगी घेणे नको वाटते, बेकायदा बांधकाम बांधले, तर जास्ती रक्कम भरली तरी परवडते; मात्र अधिकारी परवडत नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.
कोंढवा खुर्दे या महत्त्वाच्या काही भागांत रिकाम्या जागेत एक ते दीड दिवसात इमारतीचा पाया खणला जातो आणि जेमतेम १० दिवसांच्या कालावधीत काही स्लॅबही उभारले जात असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बांधकाम परवानगी घेतली गेलेल्या मूल्यांकित जागेपैकी तीन पट बांधकाम करून बेकायदा मनोरे बांधण्याचे कामही या ठिकाणी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
असाच एक प्रकार कोंढवा खुर्द सर्वे नंबर 46 नुरानी कब्रस्तान च्या समोर दिसून आला आहे. येते 8 मजला अनधिकृत बांधकाम तसेच त्यावर अजून बांधकाम करायचं काम चालू आहे. बांधकाम संदर्भात विचारपूस केल्यास असे कळाल की समर सय्यद व असीम काझी यांचे पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची संबंध असल्याकारणामुळे यांच्या अनधिकृत बांधकाम वर कारवाई होत नाही.
नागरिकांना बांधकाम परवानगी जलद देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अनधिकृत बांधकामे सुरू असतील तर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन पुणे महानगरपालिका बांधकाम अधिकारी देत असतात.
पुणे महानगरपालिका, नगरविकास विभाग बांधकाम परवाना वेळेत देत नाहीत. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे बेकायदा बांधकाम परवडले.
नागरिक पुणे महानगरपालिका प्रशासन हे लोकाभिमुख काम करीत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बेकायदा बांधकामांवर पालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.असे नागरिकांचे म्हणणे आहे