पुणे प्रतिनिधी : कोथरूड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता लिंबोळे ,संस्थापक अध्यक्ष जगदंब महिला बचत गट आयोजित महिलांचे व्यक्तीमत्व विकसन आणि संभाषण कौशल्ये या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देताना प्रा.विजय नवले मार्गदर्शन केले यावेळी पुढे म्हणाले कुशल गृहिणी,आदर्श माता आणि सर्वगुणसंपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे.यासाठी प्रथम प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनक्रम,दररोजची दिवसभरातील घरातील,बाहेरील कामे,आठवड्यात पूर्ण करण्याची, महिन्याभरात पूर्ण करण्याची कामे याची सविस्तर यादी करावी.
त्यातून घरातील घराबाहेरील कामांचे वर्गीकरण करावे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले वैयक्तिक टाइम टेबलं तयार करावे.कामाचा प्राधान्य क्रम ठरवावा, प्रत्येक कामाला लागणार वेळ निश्चित करावा. त्यातून आपल्यालाच लक्षात येईल की,आपण किती तास कुठे घालवतोय,आपला वेळ नेमका कुठे जातोय,वाया जाणारा व्यर्थ जाणारा वेळ किती आहे आणि कश्यामुळे आहे.
सुरवातीला एक महिना असा प्रयोग करून पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्या हाती स्वतःसाठी हक्काचा किती वेळ दररोज शिल्लक असतो ते समजेल आणि त्यावेळचा सदुपयोग कसा करावा याचे नियोजन करता येईल फक्त इच्छाशक्ती हवी सर्व काही शक्य करता येते.वेळेचे नियोजन केल्या मुळे आपल्या व्यक्तीमत्त्व विकास होण्यास वेळ लागणार नाही असे प्रेरणादायी व्याख्यान देऊन उपस्थित महिलांना आत्मनिर्भर बरोबर आत्मविश्वास जगण्याचा मार्ग दाखविला.
यावेळी बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून :
संध्याताई नलावडे (पायलट)
प्रेमा पाटील (ए.पी.आय.)
वैशाली सुळे(पी.एस.आय.) उपस्थित होत्या.
सर्वांचे आभार सौ.संगिता लिंबोळे ,संस्थापक अध्यक्ष जगदंब महिला बचत गट यांनी मानले.