पुण्यातील माथाडी हमाल, डमी व भ्रष्ट अधिकार्यांची न्यूज प्रहार लवकरच पोलखोल करणार…
न्यूज प्रहार ( पुणे ) : माथाडी कायदा हा व्यापारी व कामगार अशा दोन्ही घटकांच्या फायद्याचा आहे. परंतु, सध्या शहरामध्ये माथाडीच्या बेकायदा संघटना स्थापन होत असून, त्या गुन्हेगार पद्धतीने व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. व्यापाऱ्यांनी अशा गुन्हेगारी व बेकायदा माथाडींना घाबरण्याचे कारण नाही. अशा घटना घडल्यास पोलिस व कामगार आयुक्तालयाकडे तत्काळ तक्रार करावी. असे कायदे असताना सुद्धा राहुल घारे राजेश घारे या माथाडी कामगाराचे माथाडीचे कलेक्शन करण्याचे काम करतात. राहुल घारे व राजेश घारे हे दोघं माथाडीचे काम करतात .
राहुल घारे हा माथाडी मंडळाचा नोंदणीकृत कामगार असून,अनेक वर्षापासून माथाडीच्या नावाखाली दादागिरी बेकायदेशीर रित्या करून पैसे कमवण्याचे काम करत आहे. याच्यावर आता म्हणजेच ७/३/२०२४ रोजी चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये भा द वि १८६० कलम ३४१,५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तरीसुद्धा हा राहुल घारे दोन प्रकारचे लायसन वापरत आहे. एक म्हणजे के आर सी इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एअरपोर्ट आणि विविध कामगार संघ अशा प्रकारचे बनावट नोंदीचे आयडी वापरून माथाडी बोर्ड पुणे यांचे फसवणूक करत आहे.
दोन (ID) असताना काम करण्याची परवानगी माथाडी बोर्ड कधीही देत नाही असा कायदा असताना सुद्धा, राहुल घारे ला दोन प्रकारच्या वेगवेगळ्या नोंदणीकृत आयडी कशा मिळाल्या हा सुद्धा एक प्रश्न अनुत्तरीच आहे. या सर्वाला माथाडी बोर्ड सपोर्ट तर करत नाही ना ? अशी चर्चा देखील आहे. कॉमर झोन आयटी पार्क के.रहेजा या कन्स्ट्रक्शन च्या नावाने तो माथाडी चालवतो, या सर्वांना राजेश घारे हा मेन सूत्रधार आहे. याच्यामुळेच राहुल घारे दादागिरी करून अनेक ठिकाणावरून मारहाण करून माथाडी च्या नावाने पैसे गोळा करतो, हा किमान एका गाडीला वीस हजार ते पन्नास हजार रुपये घेतो कधी कॅश घेतो तर, कधी आर जी इंटरप्राईजेस( R G enterprises) च्या नावाने चेकने पैसे घेतो परंतु हे इंटरप्राईजेस रजिस्टर आहे का?
तर नाही ,त्यामुळे येथे माथाडी लागू होत नाही. अशा ठिकाणी माथाडी बोर्ड व स्थानिक गावगुंडांच्या मदतीने तो पैसे गोळा करतो . एका आयशरला म्हणजेच साधारणता २० फूट कंटेनर खाली करण्यासाठी १८ ते २२ हजार रुपये घेतो. परंतु हा खरंच काम करतो का ?
तर नाही फक्त दादागिरी करून या आयशर मालकांकडून सुद्धा जबरदस्ती पैसे घेतो. तसेच पाण्याचे जार, ब्लू डार्ट कुरिअर यासारख्यांकडूनही राहुल घारे मोठ्या प्रमाणात पैसे घेतो. काम करायचे म्हटले तर तो स्वतः काही न करता अनोंदीत लोकांकडून जबरदस्तीने काम करून घेतो. याच्यावरती कारवाई करायचं म्हटलं तर हा जीवे मारण्याच्या धमक्या देतो. त्यामुळे हातावरचे पोट असणारी लोक याच्या नादी लागत नाही .
हा गरीब लोकांना तर सोडत नाहीतच परंतु यांना कोणी आडवं गेलं तर किंवा याच्या विरोधात कुणी गेलं तर याचा मोरक्या म्हणजेच राजेश घारे यांनी आज पर्यंत नवनाथ पठारे सचिन सातपुते अनिल जवळकर शैलेश बनसोडे अशा दिग्गज लोकांवरती खंडणीचे गुन्हे पोलिसांना हाताशी धरून दाखल केले आहेत. परंतु स्वतः मात्र मोकाट फिरत आहे, कारण माथाडी बोर्ड म्हणजेच तेथील सर्व अधिकारी यांना मजबूत पाकीट चालू असल्यामुळे राजेश घारे वरती पोलीस व माथाडी बोर्ड कोणतीही कारवाई करत नाहीत, उलट त्याला सपोर्ट करतात.
राहुल घारे हा माथाडी बोर्डाची तर फसवणूक करतोच परंतु त्याचसोबत माथाडी च्या कायद्यांना त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. बीजेपीच्या नावाने पावती करून पैसे घेणे ही सरळ सरळ खंडणी आहे तरी देखील BJP च्या दिग्गज नेत्यांचे नाव सांगून विविध प्रकारच्या लोकांकडून व बिल्डर्स कडून तसेच जिथे जिथे माथाडी काम करते त्या ठिकाणी हा दमदाटी करून पैसे गोळा करतो. आमदार खासदारांची नावे सांगून जर हा लोकांची एवढी फसवणूक करत असेल तर पोलीस प्रशासन व माथाडी बोर्ड यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करेल का? असा प्रश्न माथाडी मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी केला आहे.