Newsprahar

उरूळी कांचन व लोणीकाळभोर परिसरात स्टिल माफीया सक्रीय…

NEWS PRAHAR ( हडपसर )- रूळी कांचन व लोणी काळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कुंजीरवाडी,सोरतापवाडी व थेऊर फाटा ह्या भागातील स्टील चोरीचा काळा बाजार थांबवावा अशी मागणी सुजान नागरीक करत आहेत.

उरूळी कांचन व लोणी काळभोर च्या हद्दीतील कुंजीरवाडी,सोरतापवाडी, थेऊर फाटा या सोलापुर रोडला  लागून असणाऱ्या गावात  यवत मधील स्टील च्या कंपनी मधून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या स्टिल च्या अनेक गाड्या दररोज हजारो किलो स्टीलची चोरी ड्रायवरच्या संगनमताने केली जात असल्याचे सुजान नागरिकांकडून याची माहीती मिळत आहे. मात्र पोलिसांकडून या चोरीच्या व्यवसायावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने सुजान नागरिकांनी नाराजी व्यक्त  केली आहे.

विशेष म्हणजे स्टिल चोरीतील काळाबाजार होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक नागरिकांनी न्युज प्रहार च्या प्रतिनिधी ला दिली आहे. सुमारे २० ते २५ टन स्टील चोरीचा काळा बाजार करून सुमारे ५ ते १० लाखांची आर्थिक उलाढाल होत असल्याची जोरदार चर्चा हवेलीत होताना दिसत आहे. स्टिल चोरी करणाऱ्या स्थानिक व्यावसायीकांचा कोण  तरी खाकीतीलच गॉड फादर असल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहराजवळ यवत असल्यामुळे विविध कंपन्याचे बांधकाम, हॉटेल, हॉस्पीटल, बिल्डींग व्यवसायीक अशा प्रकारे स्टील कंपन्यांमधुन हजारो किलो स्टील ट्रक मधून पुरविले जाते स्टील चे माप घेऊन कंपनीमधून पुण्याला जाणाऱ्या ट्रकच्या ड्रायवरशी संगणमत करूण स्टील चोरीचा काळा बाजार उरूळी कांचन व लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावामधील नामांकित लोक रात्रीच्या वेळत मधुबन कार्यालय, लोणी स्टेशन, थेऊरफाटा,कुंजीरवाडी, सोरतापवाडी, या ठिकाणी रात्रीची स्टीलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकच सांगत आहेत व ते पुढे हे ही सांगत आहेत की एका ट्रक मधुन सुमारे ३०० ते ४०० किलो स्टिल मालाची चोरी करून हा माल स्थानिक दुकानदारांना दिला जात आहे.

दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये स्टिल चोरांचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होत आहे. स्टिल चोरी करणारे स्थानिक व्यावसायिक पोलिसांच्या डोळ्या समोर हा काळा बाजार अनेक वर्षा पासून करत आहेत तरी देखील पोलिस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे.