Newsprahar

आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला ऑफर दिल्याचा आयुक्तांनी केला खुलासा…

‘गुन्हा अंगावर घे, तुला वाट्टेल ते देतो’..!

पुणे- ल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद देऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोपीच्या आजोबांनी फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला. गुन्हा तू अंगावर घे. तुला गिफ्ट देतो. तुला वाट्टेल ते देण्याची तयारी आहे, असं आमिष देखील देण्यात आले होते. सुरुवातीला आमिष आणि त्यानंतर त्याला धमकावण्यात आले. त्याला फोनवरुन आणि त्यानंतर प्रत्यक्ष येऊन त्याच्यावर दबाव टाकण्यात आला, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.