Newsprahar

आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने दोघांना चिरडलं…

NEWS PRAHAR ( पुणे )- आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवलं आहे. यात दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका टू-व्हीलरच्या कारची धडक बसली. अपघात भीषण होता. दुचाकीचा चुराडा झाला आहे, तर कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमाराच हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते.