Newsprahar

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्ती आरोग्य रत्न पुरस्काराने डॉ सौ.सारिका डुंबरे-फापाळे सन्मानीत

न्यूज प्रहार ( पुणे ) : स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे,

मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड , श्री.दत्ता कोहिनकर – माईंड पॉवर ट्रेनर, मा. रेखा खोपकर – मा.नगरसेविका ठाणे, मा. रुपाली जाधव – संचालिका सवाई मसाले, मा. पौर्णिमा राऊत – एक्स टेलर, मा. तेजस्विनी पायगुडे – अभिनेत्री, मा. आनंद पिपळकर, डॉ.राजेंद्र भवाळकर, डॉ. सोमनाथ गिते आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय श्री. राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय सौ.शोभाताई बल्लाळ संचालिका स्वप्नल फाऊंडेशन यांनी केले. वंदना साळोखे यांच्या चौघडा वदनाने सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.

तसेच कुमारी अंजली आखाडे (नृत्यांगना) हिने सर्वांची मने जिंकली. शिवांगी आखाडे हिने बैरागी रगतिल शिव स्तुती सादर केली. वंदनाताईंनी चौघडा सनईचे अप्रतिम सादरीकरण केले. डॉ. अमित मोहिते ऊर्फ आम्रपाली यांनी तृतीयापंथी विषयी लोकांची मने कशी आहेत, ते बदलण्यासाठी काय करावे हे सांगितले.

अपर्णा काळे यांनी अतिशय सुरेख संगीत गायले. सवाई मसालातर्फे प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सवाई मसाला संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमात कृषीरत्न, सेवारत्न, आरोग्यरत्न, युवारत्न, नारीरत्न, उद्गाररत्न, लोकगौरव, बालगौरव, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श सरपंच, लोकसेवा, आदर्श माता, आरोग्य सेवा, पत्रकार आदी ७१ जणांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.