Newsprahar

अवैद्य रित्या गांज्या विक्री करणारे ०२ महिला खडकी पोलीस स्टेशनकडुन जेरबंद ; २,२१,१३०/- रु मुद्देमाल हस्तगत.


पुणे प्रतिनिधी :
मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी दिलेल्या नि
र्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने दि. ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० वा. चे सुमारास तपास पथकाचे अधिकारी पो.उप. नि. गुंजाळ, तपास पथकातील अंमलदार पो.शि.९९३४ भोसले यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही महीला व पुरुष असे मिळून पाटील ईस्टेट ब्रिजखाली, हॉटेल अलकुरेश जवळ, शिवाजीनगर, पुणे येथे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.

वगैरे मजकुराची खबर मिळाल्याने लागलीच सदरबाबत मा. वरिष्ठांना अवगत करुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पो.नि. दिघावकर सो व म.स. पो. नि. श्वेता बेल्हेकर, पो. ना. ७३५६ निकाळजे, म.पो.शि.७९७८ शिंदे, म.पो.शि. ९७२६ म्हस्के व तपासपथक स्टाफ असे बातमी प्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत स्वाना होवुन पाटील ईस्टेट ब्रिजखाली, हॉटेल कुरेश हॉटेलजवळ, गल्ली नं. ८ शिवाजीनगर, पुणे येथे मिळाले बातमी प्रमाणे दोन महिला व दोन पुरुष हातामध्ये पांढरे व निळे रंगाचे पिशव्या घेवुन उभ्या असल्याचे दिसल्या.

 त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने म. स. पो. नि. बेल्हेकर यांनी सदर दोन महिलांना हटकवुन जागीच अटकाव केला. आम्हा पोलीस स्टाफची चाहुल लागताच त्यांचेसोबत असणारे दोन पुरुष तेथुन अंधाराचा फायदा घेवून पळुन गेले. सदर महिलांना त्याचे नाव व पत्ता विचारता त्यांचे नाव अनुक्रमे :

१) झेनब कंबर इराणी, वय ४० वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, खडकी, पुणे, 

२) मोसीना नादर इराणी, वय ३२ वर्षे, रा. गल्ली नं.८, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे

 असे असल्याचे सांगितले. सदर महिलांची झडती घेतला त्यांचेकडुन अनुक्रमे, १) ९२,००० / – एक पांढरे रंगाची पिशवी त्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम किं. अं. व रोख रक्कम व इतर साहीत्य व २) ९६,०००/- एक निळे रंगाची पिशवी त्यामध्ये सर्व गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो, ६०० ग्रॅम किं. अं. व इतर साहीत्य असे एकुण २,२१,१३० /- येणे प्रमाणे वरील वजनाचा व किंमतीचा गांजा तसेच चिलीम, रोख रक्कम, मोबाईल फोन, असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली आहे. 

सदरबाबत आरोपीत नामे :

१) झेनब कंबर इराणी, वय ४० वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, खडकी, पुणे. 

२) मोसीना नादर इराणी, वय ३२ वर्षे, रा. गल्ली नं.८, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे.

 ३) जमिर कंबर इराणी.

 ४) जावेद इराणी.

यांचेविरुध्द खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ६६ / २०२४ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब),II (ब) अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याचा तपास म सहा पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. रंजनकुमार शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. विजयकुमार मगर, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्री. गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्वेता बेल्हेकर, सहा पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलीस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ, पो. ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.शि. अतुल इंगळे, पो.शि. अनिकेत भोसले, म.पो. शि. ७९७८ शिंदे, म.पो.शि.९७२६ म्हस्के यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास म. सहा पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.