पुणे प्रतिनिधी : राज्यात अनेक ठिकाणी युवा परिषद, युवा संसद असे कार्यक्रम होत असताना देशात पहिल्यांदाच सर्वात मोठी अल्पसंख्यांक युवा संसद (Minority Youth Parliament) कार्यक्रम येत्या 10 फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजित होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन जुबेर मेमन, खिसाल जाफरी आणि मुज्जम्मील शेख हे करत आहेत.
या कार्यक्रमाची प्राथमिक बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातून 65 पेक्षा जास्त अल्पसंख्याक समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांनी हजेरी लावली. या बैठकीत कार्यक्रमाचे उद्दिष्टे, व्याप्ती आणि कार्यवाही योजना यावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट अल्पसंख्याक समाजातील युवकांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम युवकांना भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. या कार्यक्रमात देशातील सर्व अल्पसंख्याक समाजातील युवक सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात खालील विषयांवर चर्चा होईल:
● अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण.
● अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या नेतृत्वाच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे.
● अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या विकासासाठी आवश्यक संसाधने.
कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी युवकांनी लवकरच आपला नोंदणी करावा.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या विकासासाठी एक महत्त्वाची पाऊल उचलली जाणार आहे.
या बैठकीत संयोजकाची भूमिकेत जमीर कागदी, समीर शेख, इलियाज शेख, शहाबुद्दीन शेख, अर्सलान शरीफ, अबु सुफियान कुरेशी, निखिल भिंगारदिवे, फहीम सैयद, एडवोकेट अतिया मेमन, एडवोकेट सीमिन शेख, फैयाज खान, मतीन मुजावर, अकबर मेमन, मौलाना शाहरुख खान, सत्यवान गायकवाड, रियाज मुल्ला, शिबान फैज, फरहान शेख, उमर मोमीन, डॉ अरबाज मोमीन, रूपेश गायकवाड, शाहबाज शेख, अयान सय्यद बासित पटेल, बिलाल पटेल, अजहर बैग, आबिद शेख, अमीन शेख, असलम कुरैशी, खाजा कवलगी, दिलावर शेख, शाहिद शेख, एडवोकेट त्रिशला गायकवाड व आदी मान्यवर उपस्थित होते.
नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क:
जुबेर मेमन
9850008278
खिसाल जाफरी
9890999955
मुज्जम्मील शेख
7887776668