Newsprahar

अल्पवयीन वाहन चोराकडून तब्बल 10 वाहने , केशवनगर येथून मुंढवा पोलिसांनी घेतले ताब्यात…

हडपसर प्रतिनिधी : याबाबत सविस्तर बातमी अशी की, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ ०५ पुणे शहर श्री आर राजा यांनी परीमंडळ ०५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम राबवीणेबाबत पोलीस ठाणेस मिटिंग घेवुन आदेश दिले होते.

सदर आदेशावरुनच मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३७४/२३ भादवी ३७९,३४ मधिल चोरीस गेलेल्या हीरो होंडा आय स्मार्ट गाडीचा शोध घेणेबाबत मुंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांनी मुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक श्री संदीप जोरे व तपास पथक स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेवरुन मुंढवा तपास पथक अधिकारी व स्टाफ मुंढवा पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार पोहवा ७३२ दिनेश राणे यांना यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्हयातील पकडलेला अल्पवयीन दुचाकीवर जात असताना दिसुन आलेने त्यास थांबवुन सदर वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने समर्पक उत्तर न दिल्याने सदर बाबत पोलीस ठाणे अभिलेख पडताळुन पाहीले असता मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३७४/२३ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत माहीती मिळाल्याने सदरचे वाहन त्यानेच चोरल्याबाबतची खात्री झालेने त्या अल्पवयीन कडे त्याचे पालकासमक्ष अधिक चौकशी केली असता त्याने हडपसर, मुंढवा व लोणीकाळभोर येथुन एकुण १० दुचाकी वाहने चोरी केलेचे तपासात निष्पन्न झालेने सदरची वाहने जप्त करण्यात आली आहेत व हडपसर उपविभागातील एकुण वाहन चोरीचे १० गुन्हे उघड करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले असुन एकुण २,७५,०००/- रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील वी स बालकाकडुन वाहन चोरीचे खालील गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत.

नमुद प्रमाणे वाहनचोरीचे १० गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे सो, अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री आर राजा, पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्रीमती संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे पोहवा ५४१८ संतोष जगताप, पोहवा दिनेश भांदुर्गे, पोहवा राहुल मोरे पोशी ४४४१ स्वप्नील रासकर पोशी सचिन पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment