Newsprahar

पारनेर तालुक्यातील आळकुटी गाव रांधेफाटा येथील अवैध पत्यांच्या क्लब चा तालुक्यात चांगलाचा भोबाटा; अशा धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उध्वस्त…

न्यूज प्रहार  ( पारनेर ) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना काही दिवसापूर्वी अळकुटी गाव रांधेफाटा येथे संतोष गायकवाड यांचा 25+50 असा 3 टेबल लावून पत्त्यांचा क्लब हॉटेल जोगेश्वरी व्हेज नॉनव्हेज येथे सुरू असून विनापरवाना दारू ही या हॅाटेलमध्ये आहे तरीही पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे ठोस कारवाई करून पत्त्यांचा अड्डा नष्ट करावा कारण संतोष गायकवाड यांच्या त्त्यांचा क्लब व LCB ची वसुली करणारा झीरो अशी पारनेर तालुक्यात चांगलीच चर्चा आहे. याबाबत नागरिकांनी पोलीसांन बाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पारनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय सुरू असून दारू परवानाधारक हॉटेल पेक्षा विनापरवाना हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं मटका गुटका, बिंगो हे उद्योग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांनमध्ये आहे.

तालुक्यात अवैधरीत्या चालणाऱ्या ढाब्यांवरती व दारू अड्डयाकडे दुर्लक्ष का ? अवैधरीत्या दारू व्यवसाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढाब्यावर खुलेआम होत आहे.त्याला कायमस्वरूपी निर्बंध का लागत नाही यावर देखील विचार होणे गरजेचे आहे.या वरती पोलीस कार्यवाही करणार का? असा प्रश्न नागरीक करीत आहेत.